शेंदुर्णीत शस्त्राचा धाक दाखवून तीन लाख लुटले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
 
शेंदुर्णीत शस्त्राचा धाक दाखवून तीन लाख लुटले
 
* वीजपुरवठा खंडीतचा चोरट्यांनी घेतला फायदा
 
* शेंदुर्णीत नर्मदा कॉटन इंडस्ट्रीजमधील प्रकार
 
* धाडसी सशस्त्र दरोड्याने भीतीचे वातावरण
 
* पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह
 
तभा वृत्तसेवा
शेंदुर्णी,ता.जामनेर ७ एप्रिल
शेंदुर्णी - पहूर रस्त्यावरील नर्मदा कॉटन इंडस्ट्रीजमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून तीन लाखांची लूट केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री २.२० वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ५ एप्रिल रोजी दुपारपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तब्बल दुसर्‍या दिवशी सकाळी विद्युत पुरवठा सुरळीत झाला. रात्रभर वीज नसल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात चार दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या २ वाजेच्या सुमारास नर्मदा कॉटन फॅक्टरीत प्रवेश करुन रात्रपाळीला कामात असलेल्या वॉचमन यास शस्त्राचा धाक दाखवून फॅक्टरीचे मालक दिपक अग्रवाल यांच्याकडे नेले. वॉचमन, मालक, हिशोब तपासणीस मोहीत मिश्रा यांना चाकू, तलवारीचा धाक दाखवून लॉकरमध्ये ठेवलेली तीन लाखांची रोकड पिशवीत टाकूण पळून गेले आणि बाहेरुन दरवाजा लावून घेतला.
फॅक्टरी मालक दिपक अग्रवाल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेंदुर्णी पोलीस चौकीवर एक पोलीस उपानिरीक्षक व ५ ते ७ पोलीस कर्मचारी आहे. त्यातील एखादे दोन सोडले तर सर्वजण अपडाउन करतात. ज्या दिवशी रात्री गस्तची ड्युटी आहे. ते त्या दिवशीच मुक्कामी असतात. नाहीतर उर्वरीत दिवशी अपडाउन करीत असल्याने शेंदुर्णीत कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होवून चोरटे सक्रीय झाले आहे. पोलिसांनी चोख गस्त वाढवावी व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@