आजारांना प्रतिबंधासाठी ‘ओमकार थेरेपी’ गरजेची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
आजारांना प्रतिबंधासाठी ‘ओमकार थेरेपी’ गरजेची : कल्याणी कुलकर्णी
जळगाव, ७ एप्रिल
जीवनमान झपाट्याने बदलत असून, स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी कॅन्सरसह विविध आजारांना सामोरे जावे लागते आहे. त्यांना प्रतिबंधासाठी ‘ओमकार थेरेपी’ महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील ओमकार साधनेच्या शिक्षिका कल्याणी कुलकर्णी यांनी केले. ‘आम्ही मैत्रिणी कॅन्सर सपोर्ट ग्रुप’च्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त शनिवारी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
 
 
कॅन्सरग्रस्त महिलांना मानसिक आधार मिळावा यासाठी ला. ना. शाळेतील संगीत शिक्षिका रेवती ठिपसे यांनी काही मैत्रिणींच्या मदतीने ७ एप्रिल २००८ रोजी आम्ही मैत्रिणी कॅन्सर सपोर्ट ग्रुप स्थापन केला. त्याला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. सूत्रसंचालन उषा शर्मा यांनी केले. आभार राखी अग्रवाल यांनी मानले. व्यासपीठावर डॉ. तिलोत्तमा गाजरे, डॉ. मनिषा दमानी, डॉ. श्रद्धा चांडक होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालन तसेच ‘कॅन्सरवर ऍन्सर’ आणि साहित्यावर आधारीत एका पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
 
विविध आजारांवर ६१ प्रकारचा ओमकार उपयोगी
ओमकार साधनेत प्रत्येक दुर्धर आजाराला चांगले करण्याची ताकद आहे. धार्मिकेसोबत याला आता शास्त्रीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. दृष्टीदोष, वाणीदोष, कॅन्सर, कोमात जाणे यासारख्या आजारांसाठी विशिष्ट लयबद्धतीचे ओमकार असून शास्त्रशुद्ध आणि लयबद्धरित्या नियमित केल्यास हे आजार बरे होतात. ओमकार साधनेमुळे दृष्टीदोष झालेला रुग्ण बरे झाला असल्याचे उदाहरणही कल्याणी कुलकर्णी यांनी दिले.
@@AUTHORINFO_V1@@