खान्देश पापड महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसादनागली पापड, बिबडया, फ्लेवर पापडला खवय्यांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
खान्देश पापड महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद
नागली पापड, बिबडया, फ्लेवर पापडला खवय्यांची मागणी
 
जळगाव, ७ एप्रिल
जळगाव जनता सहकारी बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांच्यातर्फे महिला बचतगटांसाठी लेवा बोर्डीग हॉल येथे ६ ते ८ एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत खान्देश पापड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात जळगावसह चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल, धरणगाव , यावल, बोदवड, पिंप्री इ. ग्रामीण भागातील ६० ते ६५ स्टॉल आहेत. त्यात अस्सल खान्देशी चवीचे बिबड्या, नागलीचे पापड, उपवासाचे साबुदाणा पापड, साबुदाणा चकली, भगर चकली, बटाटा शेव, शिंगाडा कुरडयी यासह गृहोपयोगी वस्तू तसेच सौंदर्यविषयक वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दादावाडीतील प्रेरणा गृह उद्योगाच्या प्रतिभा येवले यांच्याकडील विविध तयार मसाले आणि सरबत पावडरींना वाढती मागणी आहे.
त्यात चविष्ट आणि रुचकर नागली पापड, बिबडी,टोमॅटो, पालक, बीट, लसूण, या फ्लेवर पापडला खवय्यांची वाढती पसंती मिळत आहे. त्यातील विशिष्ट पदार्थांमुळे याला घरच्या पापडाची चव प्राप्त होेते. यामुळे जळगावसह मुंबई, पुणे, अहमदाबाद, बडोदा, सुरत, इंदौर, तसेच आंध्रप्रदेश आणि पंजाब या राज्यातील खवय्यांची या पापडांना पसंती मिळत असून मागणी वाढली आहे. अशी माहिती स्टॉलधारक विक्रेत्या महिलांनी दिली.
 
विविध फ्लेवरचे सरबत यंदाचे वैशिष्ट्य
महोत्सवात खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तूंसह विविध प्रकारातील घरगुती फ्लेवर्स सरबत हे यंदाचे वैशिष्ट्य आहे. त्यात लिंबू सरबत, कैरी सरबत, कोकम सरबत इ. प्रकारचे सरबत स्टॉल आहे. चवीने मधुर, गार तसेच चविष्ट सरबत पिण्यासाठी तसेच खाद्यवस्तू खरेदीसाठी तोबा गर्दी उसळत आहे. रविवारी रात्री १० पर्यंत स्टॉल असतील.
 
 
@@AUTHORINFO_V1@@