विवाह समारंभास येणार्‍या एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
 
विवाह समारंभास येणार्‍या एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी
जळगाव, ८ एप्रिल
जळगाव येथे विवाह समारंभास येणार्‍या एका इसमाचा अपघात होवून जखमी झाला आहेत तर दुसर्‍याला चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवाररोजी घडली.
महादू भागवत लाटे वय ४० रा. पिंपळकोठा हे रविवार रोजी दुपारी १२.३० वा महाबळचा रस्त ओलांडून विवाहसमारंभात सहभागी होण्यासाठी सागरपार्ककडे येत असतांना एका वाहनाने त्यांना धडक दिली. यात ते जखमी झाले. या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
तर दुसर्‍या घटनेत अन्ना हरी वराडे वय ३६ रा. विटनेर ता. जळगाव हे जळगाव येथे विवाह समारंभास येत असांना गुलाबराव देवकर महाविद्यालयाजवळ त्यांना चक्कर येवून ते खाली कोसळले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या बाबत उशिरा पर्यंत पोलीसात नोंद करण्याची कारवाई सुरू होती.
 
@@AUTHORINFO_V1@@