नेमबाजीत भारताने मारली बाजी : मनु भाकेरला सुवर्ण पदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
 
 
 
गोल्ड कोस्ट :  गोल्डकोस्ट येथे सुरु असेलल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारोत्तोलनानंतर आता नेमबाजीत भारताने बाजी मारली आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मनु भाकेर हिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच सुवर्ण तर हिना सिद्धूने रौप्य पदक पटकावले आहे.
 
 
 
 
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दोघींचीही प्रशंसा करत "आता आपल्या नेमबाजांची पाळी" असे म्हणत त्यांचे अभिनंदन केल आहे. 
 
 
  
 
नुकत्याच झालेल्या ज्यूनिअर आणि सिनिअर नेमबाजी विश्वचषकात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या मनू भाकेरने राष्ट्रकुलमध्येही आपली विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४०.९ गुणांची कामाई करत सुवर्ण पदकावर पटकावले.
 
तर भारताच्याच हिना सिद्धूनेही १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २३४ गुणांसह रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाच्या एलेना हिने २१४.९ गुणांसह कांस्य पदक पटकावले.
 
 दरम्यान पुरुष नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूल या प्रकारात भारतीय नेमबाज रवि कुमार याने कांस्य पदक आपल्या नावावर केले आहे.  
@@AUTHORINFO_V1@@