दलित आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा विरोधकांचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |

केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांची विरोधकांवर टीका




नवी दिल्ली : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे धास्तावलेले विरोधक दलित समाजाची दिशाभूल करून त्यांच्याकडून हिंसक आंदोलने करवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत' असा आरोप केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केला आहे. नवी दिल्ली येथील भाजप मुख्यलयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते. यावेळी त्यांच्यासह केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोट हे देखील याठिकाणी उपस्थित होते.

'संपूर्ण देशात सध्या पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढत निघाली आहे. त्यामुळे दलित समुदाय देखील मोठ्या प्रमाणात भाजपची कास धरत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस, सपा आणि बसपा यांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. म्हणून हे सर्व दलित समाजाची दिशाभूल करून त्यांच्या मार्फत हिंसक कारवाया करवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत' असे प्रसाद यांनी यावेळी म्हटले. तसेच दलित समाजाने आता सावध होणे गरजेचे असून विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिली पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले. याच बरोबर अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये अनेक नवे बदल करून तो कायदा अधिक सक्षम आणि दलित हिताच्या दृष्टीने व्यापक बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गहलोट यांनी यावेळी आपले मत व्यक्त करत बसपा अध्यक्षा मायावती यांच्यावर जोरदार टीका केली. फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून मायावती या कांशीराम आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन दलित समाजाकडून हिंसक कारवाई करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही हिंसेचे समर्थन केले नाही, तसेच कांशीराम यांनी देखील कधीही हिंसेला पाठींबा दिला नाही. परंतु मायावती मात्र एकीकडून स्वतःला आंबेडकर आणि कांशीराम यांच्या अनुयायी म्हणवून घेतात व दुसरीकडून हिंसेचे समर्थन करून नागरिकांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करतात, अशी टीका गहलोट यांनी केली.
रविशंकर प्रसाद यांची संपूर्ण पत्रकार परिषद :

@@AUTHORINFO_V1@@