राष्ट्रकुल स्पर्धेत महिला संघाची आणखी एक 'सुवर्ण' कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |

सिंगापूरचा पराभव करून टेनिस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक




गोल्ड कोस्ट :
ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या चौथ्या दिवशी देखील भारताने दमदार कामगिरी करत स्पर्धेतील आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे. गतवर्षी टेनिस स्पर्धेचा अंतिम विजेता ठरलेल्या सिंगापूर संघाचा पराभव करून भारतीय टेनिस गटाने (महिला) सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारताच्या मणिका बात्रा हिच्या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३-१ अशा गुणांनी सिंगापूर संघाचा पराभव केला आहे. 
आजच्या या अंतिम सामन्यात भारत आणि सिंगापूर याच्यात एकूण चार उपसामने घेण्यात आले होते. ज्यामध्ये तीन एकेरी सामने आणि एक दुहेरी सामना घेण्यात आला होता. यातील पहिला एकेरी सामना भारताची मणिका बात्रा आणि सिंगापूरची टी.फिंग या दोघींमध्ये घेण्यात आला होता. या पहिल्या सामन्यात मणिकाने फिंगचा ४८-४६ अशा गुणांनी पराभव केला. यानंतरचा भारताची मधुरिका पाटकर आणि मेंग्यू यु हिच्या घेण्यात आला, परंतु या सामन्यात मेंग्यू युने मधुरिकाचा ११-१३ अशा गुणांनी पराभव केला.
तिसरा सामना हा दुहेरी पद्धतीने घेण्यात आला. यामध्ये भारताकडून मौमा दास आणि मधुरिका पाटकर तर सिंगापूरकडून यीहान झोयु आणि मेंग्यू यू या दोन जोड्या आमनेसामने आल्या. यासामन्यात देखील सिंगापूर ४१-३१ अशा गुणांनी पराभव करत, भारताने दुहेरी सामना देखील आपल्या नावावर केला. यानंतरच्या चौथ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मणिका बात्रा आणि यीहान झोयु या दोघी आमनेसामने आल्या, या अंतिम मणिकाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन वापर करत झोयूचा ३३-१८ अशा गुणांनी पराभव केला. तसेच अंतिम ३-१ अशा फरकाने आपल्या खिशात घातला.




भारतीय संघाच्या या सुवर्ण कामगिरीमुळे सध्या देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. विशेष म्हणजे आजचा शुटींग स्पर्धेत देखील भारताच्या मानू भाकरे हिने देखील देशाला एक सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्यामुळे भारतीय महिलांनी एकाच दिवसात तब्बल दोन सुवर्णपदके देशाला मिळवून दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@