दोन ट्रॅक्टर मालकांकडून सव्वा दोन लाख रु. दंड वसूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
 
 
 
दोन ट्रॅक्टर मालकांकडून सव्वा दोन लाख रु. दंड वसूल
 
शिंदखेड, ७ एप्रिल
शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथे तापी नदी पात्रात ६ एप्रिल रोजी मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करतांना तहसीलदार सुदाम महाजन यांनी ट्रॅक्टरच्या ट्रालीत बसून जात अवैध वाहतूक करणार्‍या ४ ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली होती आणि ते शिंदखेडा पोलीस स्टेशनला जमा केले होते. त्यातील दोन ट्रॅक्टर मालक जिजाबराव पवार व विकास पवार यांनी प्रत्येकी १ लाख १० हजार ६१३ एवढी दंडात्मक रक्कम भरली आहे
 
उर्वरित दोघेही ट्रॅक्टर मालकांनी सोमवारी दंडात्मक रक्कम न भरल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली .तसेच पळून गेलेल्या दोन्ही ट्रॅक्टर मालकांनी देखील दंड भरण्याचे कबूल केले असल्याचे तहसीलदार महाजन यांनी सांगितले .
 
अशी मोठी कार्यवाही तहसीलदार सुदाम महाजन यांनी केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात असले तरी रात्रीच्या वेळेस तापी नदीतील अच्छी येथील वाळू घाटात रात्रभर मोठ्या प्रमाणावर डंपर ची वाहतूक होत असते. अशा सूर्यास्तानंतर होणारी अवैध वाहतूक थांबवून संबंधित समाजकंटक, गुन्हेगारांवर देखील कार्यवाही करावी, अशी रास्त मागणी परिसरातील नागरिकानी केली आहे.
 
पोलीस प्रशासन ढिम्म का?...
कार्यवाही न करण्याचे गौडबंगाल काय?...
अवैध वाळू वा गौण खनिजांची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर वर नंबर प्लेट नसताना सर्रास वाळू वाहतूक करतात तरीदेखील अशा वाहनावर पोलीस प्रशासनाने कार्यवाही न करण्यामागचे गौडबंगाल काय आहे ? तसेच सदर ट्रॅक्टर हे शेतीच्या कामासाठी उपयोग करण्याचे असतांना त्यांचा व्यावसायिक कामासाठी वापर होत असतांना याकडे पोलीस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे यातून भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास यास जबाबदार कोण ?...असा सवाल सृज्ञ नागरिकांकडून केला जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@