श्रवण विकास मंदिरातील कर्णबधीर मुलांचे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 श्रवण विकास मंदिरातील कर्णबधीर मुलांचे यश
 
सावखेडा बु.॥ जळगाव
येथील विवेकांनद प्रतिष्ठान, जळगाव संचालित श्रवण विकास मंदीर या कर्णबधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही १००% उत्तीर्ण लागला आहे.
कर्णबधीर विद्यालयातून यंदा इलिमेंटरी ग्रेड परीक्षेकरीता एकूण ७ मुलांमधून प्रांजल लक्ष्मण महाले व योगेश विजयकुमार शेटे यांना द्वितीय श्रेणी (बी ग्रेड) तर इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेतून ११ दिव्यांग मुलांमधून पोर्णिमा अनिल अहिरे व बुध्दभुषण जीवन गवळे हे द्वितीय श्रेणी (बी ग्रेड) मधून उत्तीर्ण झाले.
 
या यशाबद्दल विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे, कोषाध्यक्षा हेमाताई अमळकर, शालेय समिती प्रमुख पूनमताई मानुधने, मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, वाहन विभाग प्रमुख मिलिंद पुराणिक व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक गिरीश बडगुजर व मच्छिंद्र भोई यांचे मार्गदर्शन लाभले.
 
@@AUTHORINFO_V1@@