कर्नाटकामध्ये कॉंग्रेस संघ आणि भाजपच्या विचारधारेला पराभूत करेल : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |

 
कोलार(कर्नाटक) : आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्ष कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारधाराला पराभूत करेल आणि त्यांना घरी पाठवेल. त्यानंतर आम्ही छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि नंतर शेवटी लोकसभा निवडणुकीत पराभूत भाजपला पराभूत करू असा ठाम विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल यांनी आज मांडला.
 
कर्नाटकमधील कोलार येथे आयोजित केलेल्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान ते बोलत होते. यावेळेळी त्यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत जोरदार टीका केली.
 
राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारताच्या युवावर्गाला दिलेल्या वचनांपैकी एकही वचन पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांनी दिवसभर जरी त्यांच्यापुढे कर्जमाफीसाठी हात जोडले तरी ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाहीत. तसेच भाजप नेते भारतात कुठेही गेले तरी दलित आणि आदिवासी समाजाचा अनादरच करत राहिले. भाजपच्या मंत्र्यांनी भारतीय राज्यघटनेत बदल करण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेमध्ये काहीही बदल केले तरी त्यांनी काँग्रेस पक्षाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.
 
तसेच राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या नेत्यांच्या तोंडून पहिल्यांदा सत्य बाहेर पडताना ऐकले जेव्हा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी येडीयुरेप्पा यांचे सरकार भ्रष्ट असल्याचे वक्तव्य केले होते. नरेंद्र मोदी हे पीएनबी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य दोषी असलेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी याच्या चांगल्या परिचयाचे आहेत. आणि हे दोघे देश सोडून पळून गेले तरीही मोदींनी अजूनही यावर काही वक्तव्य केलेले नाही. तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून रॅफेल करार रद्द करून पंतप्रधानांनी बंगलोर येथून हजारो नोकऱ्या काढून घेतल्या आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@