बेस्टचा ३७६ कोटीं तुटीचा अर्थसंकल्प पालिकेत मंजूर करून घेणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |

आशिष चेंबूरकर यांचा निर्धार

 

 
 
 
मुंबई : बेस्टचा २०१८-१९ वर्षाकरिताचा ३७६.७० कोटीं तुटीचा अर्थसंकल्प पालिकेत मंजूर करून घेणार असा निर्धार नवनिर्वाचित बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी केला.
 
आशिष चेंबूरकर यांना बेस्ट समितीचे अध्यक्षपद चौथ्यांदा भूषवण्याचा मान मिळाला आहे. बेस्ट समिती अध्यक्षपदी आशिष चेंबूरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली. त्यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी बोलताना चेंबुरकर म्हणाले कि, बेस्ट समोर विविध आव्हाने आहेत. त्यामध्ये बेस्टचा ३७६ कोटीं तुटीचा अर्थसंकल्प पालिकेत मंजूर करणेही आहे. याबाबत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांशी चर्चा करून या अर्थसंकल्पास सभागृहाची मंजुरी मिळविणार असा निर्धार त्यांनी केला.
 
तसेच बेस्टच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार १० तारखेपर्यंत व्हावेत यासाठी तातडीने प्रयत्न करणार असे सांगत ते म्हणाले कि बेस्टच्या वाहतूक विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी, बेस्टच्या गाड्यांची देखभाल, वारंवारता (फ्रिक्वेंसी) सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. तर बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासाठी पालिका आयुक्त आणि संबंधितांकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. बेस्टच्या विद्युत वितरण क्षेत्रात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठ्याच्या मागणीच्या तुलनेत कमी क्षमतेच्या केबल आहेत त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. म्हणून वाढीव क्षमतेचे केबल टाकणे आणि संबंधित ग्राहकांकडून प्रचलित विद्युत भाराच्या मागणीची नोंद करून त्यानुसार वाढीव शुल्क आकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@