खासदार ए.टी.पाटील १२ रोजी करणार लाक्षणिक उपोषण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |

केंद्र सरकारची माहिती जनतेला देवून अभिप्राय घेणार


 
 
जळगाव, ७ एप्रिल :
संसदेच्या अधिवेशन काळात विरोधकांनी कामकाज चालू दिले नाही, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. केंद्रातील भाजप सरकारची चांगली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचविण्यात यावी. विरोधक हेतुपुरस्कर कसा अडथळा निर्माण करतात. ही सर्व माहिती देशातील नागरिकांना कळायला पाहिजे म्हणून देशातील भाजपच्या सर्व खासदारांना आपआपल्या मतदारसंघात १२ रोजी एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करण्याचा आदेश दिल्लीवरुन आला आहे. या लाक्षणिक उपोषणात नागरिकांचे अभिप्राय लिहून घेण्यात येणार असल्याचेही आदेश असल्याचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी.पाटील यांनी सांगितले. तसेच येत्या १२ एप्रिल रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती स्वत: खा.ए.टी.पाटील यांनी भाजप कार्यालयात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
 
विरोधकांजवळ काहीच मुद्दा नसल्याने ते संसदमधील अधिवेशन काळात जाणूनबुजून गोंधळ घालत असून कामकाज वारंवार बंद पाडत होते. महत्त्वाचा अधिवेशन काळ असताना देखील विरोधकांनी प्रचंड गोंधळ घालून कामकाज होवू दिले नाही. ही बाब खूप खेदाची आहे. या सर्व गोष्टी देशातील नागरिकांना काम कळायला पाहिजे म्हणून देशभरातील भाजपचे खासदार आपआपल्या मतदारसंघात येत्या १२ एप्रिल गुुरुवार रोजी जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. या उपोषणात जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या पत्रकार परिषदेत आमदार सुरेश भोळे, महापालिका गटनेते सुनीलभैय्या माळी, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जयश्री पाटील, मनोज भांडारकर यांची उपस्थिती होती.
  
भाजपाचाच महापौर होणार
जळगाव महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होईल. आमचे मिशन ५० आहेच. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवू. आतापर्यंत महानगरपालिकेत युती कधी झालीच नाही आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे महानगरपालिकेची जबाबदारी दिली असल्याची आम्हाला पक्षाकडून काही सांगण्यात आलेली नाही. पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश येईल तो आम्हाला मान्य राहणार असल्याचे पत्रपरिषदेत आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@