काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जामीन मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |
 

 
 
जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी दोषी आढळलेल्या सलमान खानला आज जोधपूर न्यायालयाने जामीन मंजूर केली आहे. ५ एप्रिल २०१८ रोजी जोधपुर न्यायालयाने १९९८ मध्ये 'हम साथ-साथ है' चित्रपटाच्या शुटींग दरम्यान केलेल्या काळवीट शिकार प्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला दोषी ठरवून ५ वर्षांची शिक्षा सुनवली होती.
 
शिक्षेनुसार सलमान खानला ५ वर्षांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याला जोधपुर येथील केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र सलमानच्या जामिन याचिकेवर सुनावणीसाठी आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणी दरम्यान सलमानची जामिन याचिका मंजूर करण्यात आली.
 
तब्बल २० वर्षांनी का होईना पण काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल न्यायलयाने दिल्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेचे विविध स्तरातून कौतुक केले जात होते, मात्र त्यानंतर लगेच २ दिवसांतच सलमान खानला जामीन मंजूर करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. तसेच सलमानला जामिन मंजूर झाल्यामुळे मुंबईतील त्याच्या घराबाहेर त्याच्या चाहत्यांचा जल्लोष सुरु झाला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@