राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : वेंकट राहुल रगाला ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |
 

 
 
गोल्ड कोस्ट : भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची मालिका सुरु केलेली आहे. त्या मालिकेत वेंकट राहुल रगाला याचे देखील नाव आज सामील झाले आहे. ८५ किलो वजनी गटात त्याने ३३८ किलो वजन उचलून हे पदक पटकावले आहे.
 
 
आज सकाळी सतीश शिवलिंगम या भारताच्या वेटलिफ्टरने ७७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले होते. ७७ किलो वजनी गटातील सतीशने ३१७ किलो वजन उचलून आपल्या नावावर हा विजय केला. अटीतटीच्या या सामन्यात शिवलिंगम यांने इंग्लंडच्या जॅक ऑलिव्हरला मागे टाकले.
 
 
४ तारखेपासून सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या खेळांमधील भारताचे हे ६ वे पदक आहे. मीराबाई चानू (सुवर्ण), संजिता चानू (सुवर्ण), दिपक लाथर (कांस्य), पी.गुरूराजा (रजत) यांनी आत्तापर्यंत भारताचा झेंडा उंचावला असून पदक तालिकेत भारत सध्या ६ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया (४१) आणि न्यूझीलंड (२३) पदकांसह आघाडीवर आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@