जामनेर नगरपरिषद निवडणूक शांततेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |

उत्साहपूर्ण ७१ टक्के मतदान 
 १२ एप्रिलला मतमोजणी होणार

 

जामनेर :
येथील नगरपरिषद निवडणुकीत आज ६ रोजी अपेक्षेनुसार जोरदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुमारे ७०.९२ टक्के मतदान झाले. ३५ हजार ९१३ पैकी २५ हजार ४७१ (स्त्री- ११ हजार ८६७ आणि पुरुष-१३ हजार ५६४) मतदारांनी आपला हक्क बजावला. मतमोजणी आता १२ ला होणार आहे.
 
 
दरम्यान भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा दावा ‘तरुण भारत’ शी बोलतांना केला आहे. नगराध्यक्षपदासाठी विद्यमान नगराध्यक्षा साधना महाजन आणि प्रा.अंजली पवार यांच्यामधे लढत चुरशीची ठरणार असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. एकूण १२ वार्डांपैकी ११ वार्डासाठी मतदान प्रक्रिया पार पडली.
 
 
मतदानाला सकाळी संथगतीने सुरूवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत फक्त १५.५५% एवढे मतदान झाले होते.दुपारी ३ वाजेनंतर मतदार मतदानासाठी जास्त संख्येने बाहेर पडले. चार वाजेपर्यंत ४४.५० % मतदान झाले. दुपारी ४वाजे नंतर मतदारांची गर्दी वाढली तर शहरातील बर्‍याच बुथवर सायंकाळी ७ः१५ पर्यत मतदान सुरू होते. प्रभाग क्र १व२मध्ये ७०टक्यांच्या वर मतदान झाले आहे. मंत्री गिरीश महाजन, साधना महाजन, प्रा. अंजना पवार यांच्यासह उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उर्वरीत वार्ड क्रमांक ७ साठी मतदान ११ एप्रिल रोजी होईल. सर्व १२ वार्डांच्या जागांचा निकाल हा १२ एप्रिल रोजी लागणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@