राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : सतीश शिवलिंगमने दिले भारताला तिसरे सुवर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |



गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) :
सतीश शिवलिंगम या भारताच्या वेटलिफ्टरने ७७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ खेळांच्या तिसऱ्या दिवशी शिवलिंगम याने देशाला तिसरे सुवर्ण पगक मिळवून दिले आहे. ७७ किलो वजनी गटातील सतीशने ३१७ किलो वजन उचलून आपल्या नावावर हा विजय केला आहे. अटीतटीच्या या सामन्यात शिवलिंगम यांने इंग्लंडच्या जॅक ऑलिव्हरला मागे टाकले आहे.
सतीशच्या या विजयाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. ते म्हणतात की, तिसऱ्या दिवशीही भारतीय वेटलिफ्टरस् नी देशाला सुवर्ण पदक मिळवून देत सन्मानित केले आहे. सर्वांना तुमचा अभिमान आहे.


४ तारखेपासून सुरू असलेल्या कॉमनवेल्थ खेळांमधील भारताचे हे ५ वे पदक आहे. मीराबाई चानू (सुवर्ण), संजिता चानू (सुवर्ण), दिपक लाथर (कांस्य), पी.गुरूराजा (रजत) यांनी आत्तापर्यंत भारताचा झेंडा उंचावला असून पदक तालिकेत भारत सध्या ५ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया (४१) आणि न्यूझीलंड (२३) पदकांसह आघाडीवर आहे.
आजच्या दिवशी भारतीय पुरूष हॉकी संघांचा सामना चालू असून, भारत सध्या आघाडीवर खेळत आहे.
@@AUTHORINFO_V1@@