पिंप्राळा घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |

७६ घरकुलांचे आठ दिवसात वाटप

 
जळगाव :
केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको परिसरात ४७२ घरकुलांच्या योजनेला मंजूरी मिळाली होती. त्यात २५२ घरकुलांचे सोडतनुसार वाटप करण्यात आले. उर्वरित ७६ घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात असून आठ दिवसात त्यांचे वाटप केले जाणार आहे.
 
 
झोपडपट्टीमुक्त शहरासाठी केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजनेंतर्गत महानगरपालिकेला ४७२ घरकुलांची योजना मंजूर झाली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५२ घरकुलांचे काम पूर्ण करुन ती सोडतीनुसार लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांसाठी ७६ घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात असून ८-१० दिवसात वाटप करण्यात येईल.
 
 
१५६ घरकुले बांधण्याच्या प्रस्तावास मंजुरी
४७२ पैकी २५२ व ७६ अश्या ३२८ घरकुलांचे वाटप लाभार्थ्यांना पूर्ण केल्यानतंर उर्वरित १४४ लाभार्थ्यांनासाठी याच भागात पंतप्रधान आवास योजनेतून १५६ घरकुले बांधण्याच्या प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली आहे. तांत्रिक बाबींना मान्यता मिळाल्यानंतर या घरकुलांच्या कामांना देखिल सुरुवात केली जाणार असल्याची माहिती अभियंता सोनगिरे यांनी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@