नागदेवी येथे इमारतीतील गोदामाला भीषण आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |

गोदमातील वस्तू जाळून खाक

 
 
 
 
मुंबई : पायधुनी येथील नागदेवी परिसरातील एका व्यवसायिक व निवासी इमारतीत रबर व बेरिंग यांचा साठा असलेल्या गोदामात मध्यरात्री १.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये तीन गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. सुदैवाने या आगीतून ८ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
 
अग्निशमन दलाने तीन तासाने या आगीवर नियंत्रण मिळविले. तर संपूर्ण आग विझविण्यास सात तास लागले. पायधुनी क्रॉस रोड, अब्दुल रेहमान स्ट्रीट, नागदेवी येथील ८९/९३ शमीम या तळासह चार मजली व्यवसायिक व निवासी भाग असलेली इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रबर व बेरिंग यांचा साठा असलेल्या गोदामाला मध्यरात्री १.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत या इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आग पसरली होती. या आगीत लाकडी फर्निचर, इलेक्ट्रिक सामान, पंखे, गोदमातील वस्तू जाळून खाक झाले.
 
या इमारतीच्या आगीच्या ज्वाला व काळ्या धुरामुळे व इमारतीमधील अरुंद जागेमुळे आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचण आली. मात्र तरीही अग्निशमन दलाच्या जवानांनी जादा कुमक मागवून १४ फायर इंजिन, ८ जंबो वॉटर टँकर, २ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर पहाटे ४.४५ वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळविले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दल चौकशी करीत असल्याचे समजते.
 
@@AUTHORINFO_V1@@