शेतकरी, शेतमजूर स्थलांतराच्या तयारीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |
 
 
केकतनिंभोेरे परिसरातील पळासखेडे बुद्रूक, गोंडखेड, हिवरखेड बुद्रूक, माळपिंप्री, चिंचखेडे बुद्रुक, नेरी या भागात यावर्षीचा अत्यंत कमी पाऊस व अयोग्य हवामान यामुळे खरीप हंगाम हातातून गेला. त्यामुळे शेतकरी शेतमजूर हे स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत.
 
 
दोन्ही हंगामानी फिरवली पाठ
खरीप हंगामानंतर परतीचा पाऊस न आल्याने रब्बी हंगाम सुद्धा शेतकरी घेवू शकला नाही. त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. या परिसरातील शेतकरी पेरणीपूर्वी शेतीवर बँक, विकासोकडून कर्ज घेतात साधारण मार्च अखेरीस शेतीमाल विकून घेतलेले कर्ज व्याजासह परतफेड करतात. ज्या शेतकर्‍यांकडे हे कर्ज त्याचवर्षी फेडणे शक्य झाले नाही त्यांना पुन्हा कर्ज मिळत नाही. मग असे शेतकरी पुढील वर्षी सावकारांकडून कर्ज घेतात. यावर्षी शेतकर्‍यांकडे दोन्ही हंगामाने पाठ फिरविल्याने कर्ज भरण्यास शेतकरी असमर्थ आहे.
 
 
उत्पन्न नाही, मालाला भाव नाही
परिसरातील शेतकर्‍यांनी शेतीची योग्य प्रकारे मशागत केली, कोळपणी, निंदणी, खत देणे, फवारणी हे सर्व वेळेवर केले. तरी एकरी एक दोन क्विंटल कापूस, एकरी चार पाच क्विंटल ज्वारी मका एवढेच उत्पन्न आले असेल. आणि कापसाला क्विंटलला तीन ते चार हजार रुपये, ज्वारी मका, बाराशे रुपये प्रतिक्विंटल एवढाच भाव मिळत असेल तर शेतकर्‍याने काय करावे, उत्पादन खर्चही निघाला नाही. एकंदरीत काय तर यावर्षी उत्पन्नही नाही आणि थोड्या फार आलेल्या उत्पन्नाला योग्य भावही मिळत नाही. त्यामुळेच शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
 
गुरांच्या वैरणीचा प्रश्‍न भीषण
काही शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करतात त्यासाठी कोरड्या व ओल्या हिरव्या वैरणची आवश्यकता दुभत्या गाई, म्हशींना असते. कमी पावसामुळे ज्वारी, मका यांची वाढ पुरेशी झाली नाही. म्हणून चार्‍याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच परतीचा पाऊस न आल्याने शेतीमध्ये बांधावर गवत नाही. गाई, म्हशी, बैल व इतर जनावरांना घरीच खुंट्यावर चारा घालावा लागत आहे. त्यामुळे वैरण खूपच लागत आहे. हिरवे ओले वैरण तर दुभत्या जनावरांंना मिळणे अशक्य झाले आहे.
 
काम नसल्याने शेतमजूरांचे स्थलांतर
केकतनिंभोरे परिसरातील खेडेगावांमध्ये नव्हे जामनेर तालुक्यात शेतकरी शेतमजूर यांचेच वास्तव्य आहे. गावात, शेतात काम नाही म्हणून शेतकरी, शेतमजूर पुणे,नगर भागात मजूरीसाठी निघून जाण्याच्या तयारीत आहेत. मजूरांना उदरनिर्वाहासाठी दररोज काम मिळणे आवश्यक असते. कामच नाही म्हटल्यावर सगळेच संपले. घराला कुलूप लावून पोराबाळांसह काही मजूर कामासाठी परगावी गेलेत तर काही कुटुंबातील फक्त पुरुष मंडळीच गेलीत.
@@AUTHORINFO_V1@@