चंद्रपूरचा झेंडा माऊंट एव्हरेस्टवर फडकणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
 
८ एप्रिलला १० जणांच्या चमूला मिळणार हिरवी झेंडी
 

चंद्रपूर : आदिवासी बहुल असणा-या चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात गिर्यारोहण क्षेत्रात चंद्रपूरचे नांव आता सन्मानाने घेतले जाणार आहे. कठोर प्रशिक्षणानंतर ५० आदिवासी मुलांमधील १० प्रशिक्षित मुले चंद्रपूरचा झेंडा घेऊन एव्हरेस्ट सर करायला निघाले आहेत. ८ एप्रिल २०१८ रोजी आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांसह प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी सभागृहामध्ये हा शुभेच्छा कार्यक्रम होणार आहे.
 
 
 
चंद्रपूरातील सर्व आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षित १० आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्टकडे कूच करण्यासाठी हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. गिर्यारोहण क्षेत्रात जंगलातील काटकता अंगी असणा-या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन संधी या कार्यक्रमातून उपलब्ध होणार असून त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
 
गेल्या वर्षभरापासून या संदर्भात आदिवासी विकास विभागामार्फत प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये या मोहिमेची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली होती. चंद्रपूर जिल्हयातील बोर्डा, देवाडा, जिवती येथील शासकीय आश्रम शाळामधील ५० इच्छुक विद्यार्थ्यांना वर्धा येथे गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथे विद्यार्थ्यांना निवासी प्रशिक्षण देण्यात आले. 
 
 
प्रशिक्षणासाठी हिमालय, माऊंटेनिअरींग इन्स्टिटयुट दार्जिंलींग येथे १८ हजार फूट उंचिवरील गिर्यारोहणाचे २५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात अ श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांना लेह येथे एक आठवडयाचे ॲडव्हान्स विंटर ट्रेनिंग देण्यात आले. शेवटी प्रशिक्षणात अव्वल ठरलेल्या १० LL जीगरबाज चंद्रपूरकर विद्यार्थ्यांची माऊंट एव्हरेस्टसर करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये ७ मुले व ३ मुलींचा समावेश आहे. 
@@AUTHORINFO_V1@@