बांधकाम कामगारांसाठी मुख्यमंत्री समाधान शिबिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |
 
 ९ ते १८ एप्रिलदरम्यान नाव नोंदणी आवश्यक


नागपूर : मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात दोन दिवसांचे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या समाधान शिबिरात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभासाठी ९ ते १८ एप्रिलदरम्यान समाधान शिबिरासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण यांनी केले आहे. 
 
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना मंडळाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सुरक्षा, आरोग्यविषयक एकूण २८ विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. या दृष्टिकोणातून विविध सामाजिक संघटनानी व नागरिकांनी ही नाव नोंदणी करणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@