पहूरला स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |
 

 
 
पहूर, ता.जामनेर :
अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे येथे स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. यामुळे पोलिसांचा वचक संपल्याची चर्चा होत आहे.
 
 
औरंगाबाद -जळगाव महामार्गावर ही धक्कादायक घटना सकाळी निदर्शनास आली. याप्रकरणी पहूर पोलीसात अज्ञात
चोरट्यांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
 
 
स्टेट बँकेचे औरंगाबाद जळगाव महामार्गावर एटीएम आहे. पहाटे चोरट्यांनी एटीएम फोडून नुकसान केले आहे. पण सुदैवाने चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. चोरट्यांनी सावधानता बाळगून घटनास्थळावरून काढता पाय घेत पोबारा केला आहे. सपोनि मोहन बोरसे, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली आहे.
 
 
बँकेचे अधिकारी दिपक दौलत तिवारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंवि ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. याघटनेमुळे खळबळ उडाली असून भितीचे वातावरण झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@