नगरदेवळ्यात ६४० रुग्णांची निःशुल्क नेत्र तपासणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |
  
 
नगरदेवळा :
मरणोत्तर नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून मानव आपल्या दृष्टीने या भूतलावर अमर राहू शकतो ,प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला तर एका अंध व्यक्तीला हे जग पाहण्याची संधी मिळते म्हणून प्रत्येकाने ‘ दृष्टी हेच ध्येय’ मानून नेत्रदान करावे, असे मत शिवनारायण जाधव यांनी व्यक्त केले. ते निःशुल्क नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते .
 
 
येथील देवराम दोधा महाजन प्रतिष्ठान व दे .दो .महाजन पतसंस्था यांच्यातर्फे येथील सरदार एस .के .पवार विद्यालयाचे मानद चिटणीस शिवनारायण देवराम महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने निःशुल्क नेत्र तपासणी शिबिर व मोतिबिंदू निदान शस्त्रक्रिया शिबिर येथील सावता माळी समाज मंगल कार्यालयात घेण्यात आले. ६४० रुग्णांची तपासणी करण्यात आली .सकाळी ९ वा .शिबिराचे उद्घाटन नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ. सुरेश पाटील यांनी केले.
 
 
यावेळी शिवनारायण जाधव, गनीशेठ, गोपाल राऊळ, राजेंद्र महाजन, राजेश जाधव, राकेश थेपडे यांची मुख्य उपस्थिती होती.एकूण १०० रुग्णांना मोफत चष्मा देण्यात आला तर ७५ मोतिबिंदू बाधित रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे शिबिर समन्वयक योगेश जाधव यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी स्कॉऊट विभाग, रोशन जाधव, संजू नाना, भूषण जाधव, भूरा राजपूत, एस.के.पवार विद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@