पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |


 

सोशल मीडिया हाताळणीत खासदार पूनम महाजन आघाडीवर
 
मुंबई खासदारांमध्ये अग्रस्थानी असलेल्या उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून ‘नरेंद्र मोदीऍपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज संवाद साधला. भाजप खासदारांच्या आठवडा बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाचा खूबीने वापर करणार्‍या देशातील अग्रगण्य खासदारांच्या मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले होते.
 

 
यावेळी पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यकर्त्यांना देऊन, या योजनांचा प्रचार आणि प्रसार सर्वसामान्य जनतेमध्ये करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. विरोधकांच्या खोट्या प्रकाराला शांतपणे आणि सत्याच्या मार्गाने खोडून काढावे, असे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. मोबाईल ऍपचा दैनंदिन जीवनात वापर करण्याचा प्रसार आणि प्रचार करावा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विचारलेल्या निवडक प्रश्नांची पंतप्रधानांनी यावेळी उत्तरे ही दिली. या आगळ्या कार्यक्रमाचे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये खा. महाजन यांनी तसेच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी मोठे पडदे लावून, थेट प्रक्षेपण आयोजित केले होते. यावेळी मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी या संवादामध्ये भाग घेतला.
@@AUTHORINFO_V1@@