भाजपच्या पगार नाकारानंतर काँग्रेसचा देशव्यापी 'उपवास'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |

 
 
अर्थसंकल्पीय संसद सत्र सलग २३ दिवस संसद चालू शकले नाही म्हणून, त्या २३ दिवसांचा पगार रालोआ खासदारांनी नाकारला. या पाउलानंतर काँग्रेसने देखील देशव्यापी उपवास ठेवण्याची सूचना जाहीर केली आहे. देशभरात जातीय सलोखा टिकून राहावा, दलितांवरील अत्याचार कमी व्हावे, म्हणून काँग्रेस पक्ष देशव्यापी उपवास करणार आहे.
 
 
९ एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात जातीय सलोखा राखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपवास करावा अशा सूचना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून जारी करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी २ एप्रिल रोजी झालेल्या भारत बंद या आंदोलनाला पाठींबा दिला होता. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून त्यात ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
 
 
राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि संघावर निशाणा साधत ट्वीट केले आहे. त्यात लिहीले आहे की, नरेंद्र मोदी ज्या विचार धारेतून येतात त्यात बाबासाहेबांचा सम्मान कुणीही करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याला दिलेले हे प्रत्युत्तर मानले जाते.
 
@@AUTHORINFO_V1@@