राजकारणात गरिबांच्या कल्याणासाठी आलो आहोत - अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |

 
मुंबई : आमचे पूर्वज सांगतात की, राजकारण सत्ता उपभोगण्यासाठी नाही, तर देश सेवा करण्यासाठी आहे. आम्ही राजकारणात गरिबांच्या कल्याणासाठी आलो आहोत, असे प्रतिपादन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केले. मुंबई येथील भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते.
 
 
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सहित राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार आदि उपस्थित होते.
 
 
अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले की, आम्ही सत्तेचा साध्य म्हणून नव्हे तर साधन म्हणून वापर करत आहोत. गरीब जनतेच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, सध्याची नरेंद्र मोदी सरकार त्याचमार्गावर मार्गक्रमण करत आहे. पंतप्रधान यांनी सबका साथ-सबका विकासचे सूत्र साध्य करून दाखवले आहे.
 
 
अनेक लोक म्हणतात की, हा सध्याचा भाजपचा स्वर्ग युग आहे. परंतु भाजप सुवर्ण युग तेव्हाच येईल जेव्हा ओडीसा आणि पश्चिम बंगाल येथे भाजप सरकार स्थापन होईल. देशाचे खंबीर नेतृत्व मोदींमुळे उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या भीतीने साप, मांजर, मुंगुस , एकत्र  येत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@