६ महापालिकांतील ६ पोटनिवडणुकींसाठी आज मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |

‘बृहन्मुंबई’च्या एका जागेचा समावेश


 
 
 
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सहा महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज दि. ६ एप्रिल रोजी मतदान होत असून उद्या, ७ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
 
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी याबाबत माहिती दिली. बृहन्मुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर या महानगरपालिकांतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
 
पोटनिवडणूक होणाप्रभागाचे नाव व उमेदवारांची संख्या:
बृहन्मुंबई : १७३ : ३
नाशिक : १३ -क : ८
सोलापूर : १४ -क : ९
पुणे : २२ -क : ५
अहमदनगर : ३१ -ब : ३
उल्हासनगर : १७ -ब : ४
 
४ नगरपालिकांसाठीही आजच मतदान -
कणकवली (जि. सिंधुदुर्ग) व आजरा (जि. कोल्हापूर) नगरपंचायत; तसेच जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीही आजच मतदान होणार असून त्यांची मतमोजणी मात्र १२ एप्रिल रोजी होईल. तसेच, गुहागर व देवरूख (जि. रत्नागिरी) या दोन नगरपंचायतींसाठी दि. ११ एप्रिल रोजी मतदान होईल.
 
@@AUTHORINFO_V1@@