राज्याची वाटचाल ट्रिलिअन डॉलर एकॉनॉमीकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा विश्वास

 
 
 
मुंबई : जागतिक स्तरावर महाराष्ट्राकडे गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय म्हणून बघितले जाते. देशात होणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे पन्नास टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा १५ टक्के वाटा आहे. तर देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी सुमारे ४५ टक्के निर्यात ही राज्यातून होत आहे. त्यामुळे राज्याची वाटचाल ‘ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी’ कडे सुरू झाली असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
 
‘झिंटीयो एक्सचेंज इंडिया २०२२’ या जागतिक परिषदेचे गुरूवारी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी देसाई बोलत होते. या परिषदेत जागतिक बदलांसह होत असलेल्या औद्योगिक बदलांचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी पोषक ठरणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतेलेले आहेत. खासगी संस्थांमार्फत त्यांचे स्वतःचे औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यास पुढाकार घेतला जाणार असेल तर राज्य शासन त्यास सहकार्य करणार असल्याचे देसाई यांनी यावेळी नमूद केले.
 
इंटिग्रेटेड इंडस्ट्री पॉलिसी अंमलात आणणार
जागतिक स्तरावर घडणाऱ्या परिवर्तनाचा परिणाम उद्योग क्षेत्रातही दिसून येतात. त्यामुळे राज्यात इंटिग्रेटेड इंडस्ट्री पॉलिसी अंमलात आणण्याचे ठरविले आहे. या मुळे ‘सेज’ मध्ये असलेल्या त्रूटी दूर होणार आहेत. विकासकांना उपलब्ध जमिनींपैकी ८० टक्के जमीन ही औद्योगिक कारणांसाठी आणि २० टक्के जमीन ही यासाठी लागणाऱ्या सेवा देण्यासाठी वापरण्याची परवानगी देण्यात आल्याचे देसाई म्हणाले.
 
फिनटेकमुळे उद्योगांना नवी दिशा
नुकतीच फिनटेक ही नवी पॉलिसी तयार करण्यात आली असून यामुळे तंत्रज्ञान आधारित उद्योगांना नवी दिशा मिळाली असल्याचे देसाई यावेळी म्हणाले. तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक गुंतवणूक परिषदेस चांगला प्रतिसाद मिळाला. यापरिषदेपूर्वी १९ नवी धोरणे जाहीर केल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
@@AUTHORINFO_V1@@