पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीवर सुजितसिंह ठाकूर यांची नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |
 
 

 
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत अर्थात, पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिर समितीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व आमदार सुजितसिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सहअध्यक्षपदी गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांची नियुक्ती करण्यात आली असून अन्य रिक्त पाच जागांवरही नवी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामकाजासाठी राज्य शासनाने स्वतंत्र कायदा तयार केला. या कायद्यानुसार अध्यक्षांसह एकूण १२ सदस्य अशी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, या समितीमध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी राज्य शासनाने अध्यक्षांसह सदस्य संख्या एकूण १५ करण्याचा निर्णय घेतला होता. पूर्वीच्या नऊ जागांमधील रिक्त ३ जागा व सहअध्यक्षांसह नव्याने निर्मिती ३ जागांवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा आदेश राजपत्रात काल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 
या समितीच्या सह-अध्यक्षपदावर गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांची तर उर्वरित सहा रिक्त जागांवर आमदार सुजितसिंह मानसिंह ठाकूर, ह.भ.प. ज्ञानेश्वर नामदेव देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे आणि ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या मंदिर समितीचे कामकाज पंढरपूर मंदिर अधिनियमानुसारच सुरू राहणार आहे. मंदिराचे उत्तम प्रशासन व नियमन होण्यासाठी तसेच भक्तासाठी अधिक चांगल्या सोई- सुविधा पुरविणे, चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी यात्रा संबंधातील विविध धार्मिक विधी आणि समारंभ योग्यरित्या रुढी परंपरा आधारित होण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@