राजा शिवछत्रपती ऐतिहासिक गौरवगाथेला लाल किल्ल्यावर सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |
"प्रचंड वादळातही कलाकारांचा उत्साह खचला नाही , ११ एप्रिलला पुन्हा होणार प्रयोग"
 
 
 
 
 
नवी दिल्ली : आज दिल्ली येथे लाल किल्ल्यावर "राजा शिवछत्रपती" या महानाट्याचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या उदघाटनाप्रसंगी केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय राज्यमंत्री मनसुखभाई मांडविया, केंद्रीय मंत्री राधाकृष्णन आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रामलाल आदी उपस्थित होते. एक हजाराहून अधिक दिल्लीकरांनी कार्यक्रमास प्रतिसाद दिला.
 
 
अचानक आलेल्या पावसाने कार्यक्रमात व्यत्यय आला, त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. मात्र यामुळे निराश न होत आयोजन समितीने तसेच राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने ११ एप्रिल रोजी देखील या महानाट्याचे सादरीकरण करणार असल्याचे जाहीर केले.
 
 
जोरदार वादळ आणि पाऊस असला तरी देखील दिल्लीकरांचा उत्साह बघण्यासारखा होता. दिल्लीकरांना पावसामुळे झालेल्या त्रासाबद्दल प्रतिष्ठान आणि आयोजनसमितीने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच ११ तारखेला आणखी एक प्रयोग करणार असल्याचे प्रतिष्ठानने जाहीर केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@