भारतीय महिला हॉकी संघाचा मलेशियावर ४-१ ने विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
गोल्ड कोस्ट : कॉमनवेल्थ खेळांचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये भारतीय महिला हॉकी संघाने मलेशियावर मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने मलेशियाच्या महिला संघाला ४-१ अशा मोठ्या फरकाने मागे टाकत स्पर्धेत आपली जागा भक्कम केली आहे. 
 
 
 
 
 
हॉकीपटू गुरजीत कौर हिने सहाव्या मिनिटाला पहिला गोल करत या स्पर्धेत भारताचे खाते उघडून दिले. त्यानंतर मलेशियाच्या नुरैनी रशीद हिने ३८ व्या मिनिटांवर एक गोल करत मलेशियाचे खाते उघडून दिले. यानंतर पुन्हा ३९ व्या मिनिटांवर गुरजीत कौर हिने भारतासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर राणी हिने ५५ मिनिटांवर तिसरा तर लालरेमसीयामी हिने ५९ व्या मिनिटांवर चौथा गोल करत हा सामना भारताच्या खिशात घालून घेतला. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@