स्वा. सावरकरांच्या नावाचा अनुचित प्रयोग प्रतिबंधक कायद्यात समावेश करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |

डॉ. पंकज फडणीस यांची मागणी

 
 
 
 
मुंबई : देशासाठी आपल्या आयुष्याचा होमकरणार्‍या, सर्वस्व अर्पण करणार्‍या स्वा. सावरकरांच्या नावाचा ’चिन्ह आणि नावे (अनुचित प्रयोग प्रतिबंध) कायदा, १९५०’ या अंतर्गत (Emblems and Names (Prevention of Improper Use) Act, 1950) समावेश करण्यात यावा, अशी भूमिका ’अभिनव भारत संस्थे’चे विश्र्वस्त डॉ. पंकज फडणीस यांनी मांडली.
 
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्वा. सावरकरांचा गांधीहत्येत सहभाग असल्याचा आरोप नाकारला व त्यांना निष्कलंक मुक्त केले. न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती प्रसारमाध्यमे आणि सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून ‘अभिनव भारत‘ संस्थेचे विश्र्वस्त, प्रसिद्ध लेखक आणि संशोधक डॉ. पंकज फडणीस आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि. ५ एप्रिल रोजी दादर येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
 
 
डॉ. फडणीस यावेळी म्हणाले की, ’’गेल्या कित्येक वर्षांपासून सावरकरांचे नाव गांधीहत्येत गोवण्याचा खोडसाळ प्रकार काही लोक करत होते, पण १९१० साली सावरकरांना पहिल्यांदा जी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हापासून रत्नागिरीतील स्थानबद्धता, पुस्तकांवरील बंदी, स्वातंत्र्यानंतर करण्यात आलेले आरोप, कपूर आयोगाने गांधीहत्येत सावरकरांचा सहभाग असल्याबद्दल जाता जाता उल्लेखलेले वाक्य आणि त्यानंतर आता २०१८ पर्यंतच्या काळाचा विचार केला तर त्यांनी १०८ वर्षांची शिक्षा भोगल्याचे दिसते. मात्र, दि. २८ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्वा. सावरकरांना गांधीहत्येच्या आरोपातून निष्कलंक मुक्त केले आणि कपूर आयोगातील उल्लेखाला फेटाळले, त्या दिवशी सावरकरांची शिक्षा पूर्ण झाली. ते निर्दोष मुक्त झाले, ही खरेतर सर्व सावरकरप्रेमींसाठी आनंदाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. आता गांधीहत्येत सावरकरांचा हात असल्याचा जो अपप्रचार केला जातो, तो थांबला जावा,’’ अशी आमची मागणी आहे.
 
’’गांधीहत्येच्या कटात स्वा. सावरकरांचा हात असल्याचा आरोप यापुढे कोणी केला तर तो न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवमान समजून त्याविरोधात खटला दाखल केला जाईल,’’ असा इशाराही यावेळी देण्यात आला. दुसरे म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, गांधी हत्येतील फोर-बुलेट सिद्धांताला नाकारता येत नसले तरीही या प्रकरणाचे परिणाम आणि विवादास्पद स्वभाव यामुळे तो सिद्धांत स्वीकारण्यास न्यायालय तयार नाही. डॉ. फडणीस म्हणाले की, ’’न्यायालयाने फोर बुलेट थिअरीचे परीक्षण केले तर, गांधीहत्या प्रकरण हे नेहरूंच्या सार्वभौमत्वाला बळकट करण्यासाठी ब्रिटिशांनी आखलेली एक खेळी असल्याचा निर्णय न्यायालयाने घेतला असता. अशा वादविवादांचे निकाल न्यायालयात होऊ शकत नाहीत.’’
 
 
या प्रकरणाला ’सत्याची लढाई’ असे संबोधत डॉ. फडणीस पुढे म्हणाले की, ’’त्यांनी आता न्यायालयात काही चुकीच्या फेरबदलांची मागणी करणारी आढावा याचिका दाखल केली आहे परंतु, हे प्रकरण बाजूला ठेवण्यासारखे नव्हे. याशिवाय डॉ. फडणीस हे कायद्यातील सुयोग्य बदलाचा प्रचार करण्यासाठी आपल्या संविधानिक अधिकारांचा वापर करण्याची योजना आखत आहेत. यामुळे, फोर बुलेट्‌सच्या बाबतीत वादाला विरामद्यावा की, तो तार्किक निष्कर्षापर्यंत तपासला जावा, हे ठरवता येईल.’’
 
डॉ. फडणीस येत्या काळात ’रिइनव्हेस्टिगेशन इन मर्डर ऑफ महात्मा गांधी - अॅन एक्झरसाईज इन फ्यूचरिलिटी.. अ क्रिटिक ऑफ द सुप्रीमकोर्ट जजमेंट’ हे पुस्तक प्रसिद्ध करणार आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रकरणाशी संबंधित विस्तृत कागदपत्रांवर हे पुस्तक आधारित असणार आहे.
 
दरम्यान, ‘अभिनव भारत’ आणि ‘स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक’ या संस्थांनी गांधीहत्येतील सावरकरांच्या निर्दोषत्वाबाबत विश्र्वास व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर स्वा. सावरकरांचे नाव ’चिन्ह आणि नावे (अनुचित प्रयोग प्रतिबंध) कायदा, १९५०’ च्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे.
 
ताकदवान नेत्याच्या हट्टापायी गोवले
 
स्वा. सावरकरांना गांधीहत्येच्या कटात गोवणे चुकीचे होते. आंबेडकरांनीही भोपटकर वकिलांना सावरकरांच्या निर्दोषत्वाबद्दल सांगितले होते, पण फक्त एका ताकदवान नेत्याच्या हट्टापायी स्वा. सावरकरांना गांधीहत्येत अडकवले गेले. सावरकरांना राजकारणातून संपविण्यासाठी असे करण्यात आले, पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निष्कलंक मुक्त केले.
- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर स्मारक
 
’चिन्ह आणि नावे (अनुचित प्रयोग प्रतिबंध) कायदा, १९५०’च्या सूचीत समाविष्ट नावे :
१) छत्रपती शिवाजी महाराज
२) महात्मा गांधी
३) पं. जवाहरलाल नेहरु
४) इंदिरा गांधी
@@AUTHORINFO_V1@@