देश घडवायचा असेल तर मोदींना पर्याय नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |
 
 

 
 

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन 
 

मुंबई :  काँग्रेसला पन्नास वर्षात जे काम करता आले नाही ते भाजपाच्या सरकारने पाच वर्षांपेक्षा कमी काळात करून दाखवले. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखते आहे. त्यातून जातीयवाद, सांप्रदायिकता भडकावणे चालू आहे. पण देशाचा घडवायचा असेल आणि गरिबांचे भविष्य बदलायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 
 
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील बीकेसी मैदान येथे आयोजित महामेळाव्यात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अंत्योदयाची प्रेरणा घेऊन गाव, गरीब व किसानांच्या कल्याणाचे काम केले आहे. वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन, जनधन योजना अशा गरिबांसाठीच्या योजना यशस्वीपणे राबवताना सरकारने कधी जात धर्माचा भेदभाव केला नाही. केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीमुळे राज्य बदलत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने राज्यात सिंचनाचे प्रमाण चाळीस टक्क्यांवर नेऊ, असा दावाही गडकरी यांनी केला.
 
 
 
भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले यावेळी बोलताना म्हणाले की, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आपल्या सरकारप्रमाणेच गतीने काम करतो आहे. या मेळाव्यात पक्षाचे विराट रुप पाहिल्यानंतर गावागावात पक्षाचे काम करताना ध्यानात ठेवा की हा विशाल पक्ष आपल्या पाठीशी आहे. २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही पुन्हा यश मिळवायचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही भाषणे झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रास्ताविक केले तर प्रदेश सरचिटणीस आ. अतुल भातखळकर यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@