घरोघरी बायोटॉयलेट बांधून द्यावेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |

यशवंत जाधव यांचे प्रशासनाला निर्देश

 

 
 
 
मुंबई : मुंबईत शौचालय बांधणे शक्य नसलेल्या ठिकाणी पालिकेने बायोटॉयलेट बांधून द्यावेत असे निर्देश स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष यशवंत जाधव यांचे प्रशासनाला दिले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ते बोलत होते.
 
यावेळी बोलताना केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत स्वछता मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेने घरोघरी शौचालय उभारण्यासाठी अनुदान प्राप्त करून देण्याची घोषणा केली आहे. परंतु मालवाहिन्यांची व्यवस्था नसल्यामुळे घरोघरी शौचालय बांधण्याच्या योजनेलाच खीळ बसली आहे. त्यामुळे घरोघरी बायोटॉयलेट उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना लाभ मिळेल. त्यासोबत महापालिकेचे आणि केंद्रसरकारचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच मोबाईल टॉयलेटचे बायोटॉयलेटमध्ये करून ते नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावेत असे निर्देश यशवंत जाधव यांचे प्रशासनाला दिले.
 
तर मुंबई महापालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत जकात कर बंद झाल्याने आता मालमत्ता कर हे प्रमुख उत्पन्नाचे साधन झाले आहे. तेव्हा पालिकेने मालमत्ता कर थकाबाकीदारांवर विषेशतः बिल्डरांवर त्यांच्या मालमत्ता सील करणे, त्यांचा पाणीपुरवठा तोडणे, मालमत्ता जप्त करणे आदींसारख्या कडक कारवाया कराव्यात असे त्यांनी सांगितले.
 
पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने पालिकेने कापडी ज्यूट पिशव्यांच्या उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घ्यावा. नद्या व नाले यांच्या माध्यमांतून समुद्र व खाडीत जाणारा तरंगता कचरा रोखण्यासाठी सर्व नद्या, नाले यांच्या मुखाच्या ठिकाणी 'फ्लोटिंग ट्रॅश बुम' चा वापर करण्यात यावा. मिठी नदीपरिसरात सुशोभीकरण करावे, मलनि:सारण समस्या मार्गी लावावी, असेही ते म्हणाले. तसेच घरगल्ल्यांची नियमित सफाई करावी, तेथे पारदर्शक दरवाजे लावावेत. सरकारी रुग्णालयांच्या धर्तीवर गरीब, गरजू ज्येष्ठ नागरिक यांना पालिका रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार देण्यात यावेत. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वच स्मशानभूमीत पीएनजी गॅसचा वापर अंत्यसंस्कारासाठी करण्यात यावा. वाहन पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी जास्तीत जास्त वाहनतळ उभारण्यात यावेत असेही ते म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@