विकास आराखड्याला दोन टप्प्यात मंजुरी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : मुंबईचा २०१४-३४ सालासाठीच्या सुधारित विकास आराखड्यामीमध्ये काहीअंशी बदल करण्यात आला असून विकास आराखड्यासाठी हरकती आणि सूचना मागविणे आवश्यक आहे. त्यामुळे विकास आराखडा दोन टप्प्यात मंजूर होण्याची शक्यता आहे.
 
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात प्रारुप विकास आराखडयाला जानेवारीमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यांनतर अंतीम मंजुरीसाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. आराखडा अधिवेशनाच्या काळात मार्च अखेरपर्यंत मंजुरी दिली जाईल असे जाहीर करण्यात आले होते. परंतु या आराखड्यामध्ये काहीअंशी बदल केल्यामुळे त्यासाठी मुंबईकरांच्या सूचना, हरकती मागवणे आवश्यक आहे. त्यामुळे आराखडा दोन टप्प्यात मंजूर करण्याच्या हालचाली सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात काहीही बदल केला गेला नाही केवळ दुसऱ्या टप्प्यात बदल केला आहे. बदल केलेला एक आणि बदल न केलेला दुसरा असे दोन टप्पे करण्यात आले आहेत.
 
 
काहीही बदल करण्यात आला नाही असा भाग विकास आराखडाच्या पहिल्या टप्प्यात मंजूर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्या भागासाठी हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. हि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असल्यास बदल केला जाईल व त्यानंतर हा भाग मंजूर केला जाणार आहे. यामध्ये बराचसा वेळ जाणार असून संपूर्ण आराखड्याला मंजुरी मिळेपर्यंत अजून काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
तत्कालीन आयुक्त सिताराम कुंटे यांच्या काळात सन २०१५ साली विकास आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र चुकांमुळे मुंबईकरांनी तीव्र विरोध केला होता. प्रारुप विकास आराखडा रद्द करून सुधारित आराखडा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला. आराखड्याला सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला असून त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@