भारताच्या दीपक लाथेरची वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकाची कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा; एकूण ४ पदकांची कमाई 
 
 

गोल्ड कोस्ट : भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडू दीपक लाथेरने राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ च्या ६९ किलो वजनी पुरुष गटात कांस्यपदकाची कामगिरी केली आहे. 
 
 
 
 
केवळ ४ किलो वजन कमी पडल्यामुळे दिपकचे सुवर्णपदक हुकले असले तरीही दीपकच्या या यशामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. याआधी महिलांच्या ५३ किलो गटात वेटलिफ्टिंग खेळाडू संजीता चानू, ४८ किलो वजनी गटात मीराबाई चानू यांनी सुवर्णपदक आणि गुरुराज पुजारी यानेदेखील पुरुष गटातून रौप्य पदकाचा मान मिळवला आहे. 
 
 
 
 
या ६९ किलो वजनी गटात गॅरेथ इव्हान्स या वेल्श व ब्रिटिश वेटलिफ्टरने सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे, तर श्रीलंकेच्या इंडिका डिसानायाकेने रौप्यपदक पटकावले आहे. तसेच राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ मध्ये दीपक लाथेरने एकूण २९५ किलो वजन उचलले आहे. आता त्याचा तिसरा क्रमांक कायम ठेवण्यात तो यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
 
गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धांमध्ये भारताकडून वेटलिफ्टिंग सहित बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंग, स्क्वॅश, टेबल टेनिस या खेळांमध्ये सहभागिता नोंदवली जाणार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@