कार्यकर्त्यांमुळेच पक्ष मोठा झाला - भाजप स्थापना दिवशी मोदींनी केले ट्वीट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |

 
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देणारे ट्वीट केले. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांचे महत्व नमूद केले आहे. भारतीय जनता पक्षासाठी कार्यकर्ता सर्वकाही आहे. तेच पक्षाचे हृदय आणि आत्मा आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आम्ही देशाची सेवा करू शकत आहोत, अशा भावना आणि कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
 
 
 
अनेक कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आज भाजप उभा राहू शकला आहे. आम्ही सर्वांनी भाजप उभे केले आहे ते राष्ट्र उभे करण्यासाठी. नवीन भारताचे स्वप्न घेऊन पुढे जाणारा देश उभा करण्यासाठी, असे देखील ते यावेळी म्हणाले.
 
 
१९८० साली मुंबई येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. आज त्याला ३८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मुंबई येथे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@