२०१९ जिंकायचेच आहे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |
 
 
 
 

भाजपच्या विराट महामेळाव्यात अमित शहांचा कानमंत्र 

भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन, तीन लाखांहून अधिक उपस्थिती
 

मुंबई  :  भारतीय जनता पक्षाचा आजचा काळ हा काही सुवर्णकाळ नव्हे. पक्षाचा सुवर्णकाळ तेव्हाच असेल, जेव्हा ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळसह केंद्रात भाजपची बहुमतात सत्ता येईल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात केलेल्या कामाच्या जोरावर, आपल्याला '२०१९' जिंकायचेच आहे, असा कानमंत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित प्रदेश महामेळाव्यात ते बोलत होते. 
 
 
 
 
स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपने मुंबईतील बीकेसी मैदान येथे आयोजित केलेला हा महामेळावा राज्यभरातून सुमारे तीन लाखांहून अधिक कार्यकर्त्यांच्या विराट गर्दीमुळे भलताच यशस्वी ठरला. या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आगामी २०१९ च्या निवडणुकीच्या दृष्टीने आपले इरादे स्पष्ट केले. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, सुरेश प्रभू, भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, हंसराज अहीर यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील भाजपचे सर्व मंत्री, राज्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील भाजपचे सर्व खासदार, आमदार, पक्षसंघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
 
 
 
यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात देशासाठी सर्वाधिक बलिदान जर कोणत्या पक्षाने दिले असेल तर ते भाजप कार्यकर्त्यांनी दिले आहे. आज या मेळाव्यात माझी नजर जिथे आहे तिथे आणि त्याही पलीकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. ३८ वर्षांपूर्वी याच भाजपची स्थापना अटलबिहारी वाजपेयी यांनी केली, त्यावेळच्या भाषणात त्यांनी विश्वास व्यक्त केला होता की, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या कानाकोपऱ्यात केवळ कमळ आणि कमळच दिसत असल्याचे ते म्हणाले. ही वाटचाल परिश्रमपूर्वकच झाली असून यासाठी अनेकांनी बलिदान दिले असल्याचेही शाह यांनी नमूद केले. 
 
 
 
 
आपला पक्ष केवळ १० सदस्यांनी स्थापन केला. आज या पक्षाचे तब्बल ११ कोटी सदस्य असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना अमित शाह म्हणाले की, आजकाल राहुलबाबा पवारसाहेबांना बऱ्याच वेळा भेटतात. बहुतेक पवारांनी त्यांना इंजेक्शन दिले आहे. त्यामुळेच ते आजकाल विचारत आहेत की, मोदींनी चार वर्षांत काय केले. मात्र, राहुल गांधी, तुमच्या गेल्या चार पिढ्यांनी काय केले, असा सवाल देशातील जनता तुम्हाला विचारत आहे, असा टोला शाह यांनी लगावला. तसेच, राहुल गांधी, शरद पवार, तुम्ही कान उघडे ठेवून ऐका, भाजप जातीय आरक्षण कधीही काढणार नाही. तसेच, जर तुम्ही काढायला गेलात तर आम्ही काढूही देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला असल्याचे ते म्हणाले. आज देशात कोणीही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर भ्रष्टाचार करू शकत नसून त्यामुळे, हे भाजपचे पारदर्शक सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जगातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आज आपल्याकडे असून या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जे काम केले आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवूनच आपल्याला २०१९ ची निवडणूक जिंकायची असल्याचे अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केले.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@