नव्या विश्वविक्रमासह राष्ट्रकुलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |

भारताच्या मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक





गोल्ड कोस्ट :
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे कालपासून सुरु झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या पाहिल्यास दिवशी भारताने सुवर्ण कामगिरी करत वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक पटकावले आहे. भारताची मीराबाई चानू हिने नवा विश्वविक्रम रचत ४८ किलोग्रॉम वजनीगटामध्ये हे सुवर्णपदक पटकावले आहे. या या सुवर्णपदकाबरोबरच आजच्या पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी दोन पदके जमा झाली आहेत.

महिला वेटलिफ्टिंग गटामध्ये मीराबाईने ८६ किलोग्रॉम स्नॅचमध्ये आणि ११० किलोग्रॉम क्लीन अॅण्ड जर्क असे मिळून एकूण १९६ किलोग्रॉम वजन उचलले. स्नॅचच्या पहिल्या फेरीमध्ये मीराबाईने ८० किलोग्रॉम त्यानंतर ८५ आणि शेवटच्या टप्प्यात ८६ किलोग्रॉम वजन उचलले. यातील तिसऱ्या प्रयत्नात ८६ किलोग्रॉम वजन उचलण्याचा नवा विश्वविक्रम तिने रचला. यानंतर 'क्लीन आणि जर्क'मध्ये तिने ११० किलोग्रॉमचे वजन उचलून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. मीराबाई पाठोपाठ मॉरिशसच्या रॉलीया रनियावोसोवा हिने १६६ किलोग्रॉम वजन उचलून स्पर्धेतील रौप्य पदक मिळवले.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या आजचा पहिल्याच दिवशी भारताने अत्यंत दमदार पद्धतीने आपल्या खेळला सुरुवात केली आहे. आजच्या पहिल्याच दिवशी भारताने दोन पदकांची कमाई करून सध्या स्पर्धेत सर्वात अव्वल राहण्याचा बहुमान देखील मिळवला आहे. तसेच मीराच्या या कामगिरीसाठी सध्या देशभरातून तिच्या कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. 

@@AUTHORINFO_V1@@