राष्ट्रकुल स्पर्धेत गुरुराजला मिळाले रौप्य पदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |

पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताची दमदार सुरवात


 
ऑस्ट्रेलिया येथे काल राष्ट्रकुल स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम)ची सुरुवात झाली. भारताने दमदार सुरुवात केली असून, ५६ किलोच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत गुरुराज पुजारी याला रौप्य पदक मिळाले आहे. गुरुराजने प्रथम शर्यतीत १०७ किलोचे वजन यशस्वी रित्या उचलले होते, त्यानंतर १११ किलो दुसऱ्या टप्प्यात उचलले असून, तिसऱ्या टप्प्यात १३८ किलोचे वजन उचलले होते.
 
 
एकूण २४९ किलोचे वजन उचलण्यात गुरुराजला यश आले. मलेशियाचा मोहम्मद ईझार अहमदला यात सुवर्ण पदक मिळाले असून त्याने एकूण २६१ किलो वजन उचलले होते. यास्पर्धेत कांस्य पदक पटकावलेला श्रीलंकेचा चतुरंग लक्मल याने २४८ किलो एवढे वजन उचलले होते.
 
 
गोल्ड कोस्ट येथे सुरु झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची दमदार सुरुवात झालेली मानली जात आहे. काल या स्पर्धेचे उद्घाटन करताना देखील पी. व्ही. सिंधू सहित अनेक भारतीय ऑलम्पिक विजेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या देशाचे खेळाडू प्रचंड मेहनत करतात, या स्पर्धेत त्यांचे कौशल्य आपणा सर्वांना पाहायला मिळेलच. या सर्वांना आपण प्रोत्साहित करूयात, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@