अमेरिकेचे ६० राजदूत रशियातून मायदेशी परत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |

मॉस्को : अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधांमधील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेने आपल्या राजदुतांवर केलेल्या कारवाईनंतर रशियाने आज अमेरिकेच्या ६० राजदूतांना परत आपल्या मायदेशी परत पाठवले आहे. मॉस्कोतील अमेरिकन दूतावासातून आज हे सर्व ६० राजदूत अमेरिकेकडे रवाना झाले आहेत. रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या एक आठवड्याची मुद्दत आज संपत आली आहे. त्यामुळे रशियाने नावे जाहीर केलेले अमेरिकेचे ६० राजदूतांना विशेष विमानातून वॉशिंग्टनकडे पाठवण्यात आले. 
गेल्या महिन्यामध्ये ब्रिटेनमध्ये रशियन गुप्तचराची हत्या झाल्यानंतर अमेरिकेने आपल्या देशातील रशियन राजदूतांना परत रशियाला पाठवण्याचे आदेश दिले होते. यावर रशियाने देखील थेट कारवाई करत आपल्या देशातील ६० अमेरिकन राजदूतांना अमेरिकेला परत जाण्याचे आदेश दिले होते. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेच्या निर्णयाची टीका करत, रशिया देखील अमेरिकेला त्याच्या भाषेत उत्तर देण्यासाठी समर्थ असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अमेरिकन राजदूतांना रशिया सोडण्यासाठी एक आठवड्याचीच मुद्दत दिली होती.
@@AUTHORINFO_V1@@