यंदा भारतात १०० टक्के पाऊस पडणार, खाजगी वेधशाळेचा अंदाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मान्सून हा भारताच्या कृषीसाठी खूपच महत्वाचा ऋतू मानला जातो. त्यामुळे उन्हाळा सुरु झाल्याबरोबरच यावर्षी किती पाऊस पडणार याचे भाकीत मांडायला सुरुवात होतांना आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील काही खाजगी वेधशाळेने भारतात १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
 
 
त्यामुळे सध्या मान्सूनच्या दृष्टीने भारतासाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे. यावर्षी भारतात १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज खाजगी वेधशाळेकडून व्यक्त केला जात आहे. मागील वर्षी भारताच्या काही महत्वाच्या भागांमध्ये कमी पाऊस पडल्याने सध्या या भागांना पाण्याची टंचाई विशेषत: जाणवत आहे. २०१७ मध्ये १२ टक्के कमी पाऊस पडला असे वेधशाळेने स्पष्ट केले होते.
 
 
मागील चार वर्षांमध्ये भारतात पाऊस कमी पडला त्यातुलनेने यावर्षी भारतात पाऊस १०० टक्के पडेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा शेतकरी हा आनंदात राहील अशी आशा बाळगली जावू शकते. 
@@AUTHORINFO_V1@@