रालोआ खासदार नाही घेणार २३ दिवसांचा पगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांची माहिती  
 
विरोधकांची लक्षणे लोकशाहीला घातक असल्याची टीका

 
नवी दिल्ली : विरोध गदारोळ करून संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करत. त्यांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय असून विरोधकांची लक्षणे ही लोकशाहीला घातक असल्याची टीका केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 

विरोधकांच्या गदारोळामुळे सलग तेवीस दिवस संसदेचे कामकाज ठप्प पडले आहे. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्याची तयारी दाखवत आहे. परंतु विरोधक चर्चेला न येता फक्त संसदेत गदारोळ करत आहेत. यामुळे संसदेचा वेळ तर वाया जातोच पण देशहितासाठी सुरु कामांमध्ये देखील अडथळा निर्माण होत आहे' असे ते यावेळी म्हणाले. 

याचबरोबर गेल्या २३ दिवसांमध्ये एकदाही संसदेचे काम व्यवस्थितपणे पार पडलेले नाही. त्यामुळे रालोआचा कोणताही खासदार या २३ दिवसांचा पगार किंवा इतर भत्ते घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये जनतेसाठी कसल्याही प्रकारचे काम सरकारकडून झालेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या पैशातून मिळणारा पगार आम्ही स्वीकारू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@