ऑस्ट्रेलिया : कालपासून ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे कॉमनवेल्थ खेळांना सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदक आणि रौप्य पदकाची कामगिरी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या सगळ्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी मुष्टियोद्धा मीराबाई चानू आणि गुरुराज पुजारी या दोघांचे ट्वीटरवरून कौतुक केले आहे. ५६ किलोग्रॅम वजनीगटात गुरुराज पुजारी याला रौप्य पदक मिळाले असून ४८ किलोग्रॅम वजनीगटात मीराबाई चानू हिने सुवर्णपदक पटकावले आहे. या दोन्ही खेळाडूंनी यावर्षीच्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये भारताचे खाते उघडले असल्याने या दोघांना मनापासून शुभेच्छा असे यात नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.