सुषमा स्वराज 'नाम'च्या बैठकीसाठी अझरबैजानला रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

बाकू : अलिप्तवादी राष्ट्र चळवळ अर्थात 'नाम'च्या यंदा होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या अझरबैजानकडे रवाना झाल्या आहेत. भारतीय वायुसेनेच्या नभदूत या विमानामधून आज स्वराज आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी अझरबैजानकडे रवाना झाले आहेत.
नाम संघटनेची यंदाची बैठक ही अझरबैजानची राजधानी बाकू येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून स्वराज या अझरबैजानकडे रवाना झाल्या आहेत. याचबरोबर याठिकाणी होणाऱ्या एका उच्चस्तरीय बैठकीत देखील त्यासहभागी होणार आहेत. आपल्या या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये अझरबैजानच्या नेत्यांची देखील त्या भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@