चीन-अमेरिका व्यापार युद्धात आणखी एक भडका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

चीनच्या १३०० वस्तूंवर अमेरिका वाढवणार कर




वॉशिंग्टन :
चीन आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेले व्यापार युद्ध आता विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर लावलेल्या अतिरिक्त करानंतर आता अमेरिकेने चीनच्या आणखी काही वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. चीनहून आयात होणाऱ्या तब्बल १३०० वस्तूंवर हा अतिरिक्त कर लावण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या ट्रेड रिप्रेझेंटेटिव ऑफिसकडून सांगण्यात आले आहे.
चीन आपल्या व्यापारिक धोरणांच्या मार्फत अमेरिकेच्या स्थानिक कंपन्यावर घाला घालत आहे. चीनच्या 'मेड इन चायना 2025' या कार्यक्रमांतर्गत चीन अमेरिकन कंपन्यांचे तंत्रज्ञान आपल्या देशात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार चीनवरून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावून स्वदेशी वस्तूंना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे रिप्रेझेंटेटिव ऑफिसकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयाची चीनने जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार केली आहे. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी इतर देशांच्या व्यापारावर घाला घालत असल्याचा आरोप चीनने केला आहे. तसेच अमेरिकेने ५० बिलियन डॉलर इतका अतिरिक्त कर चीनी मालांवर आकारण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही चीनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@