चंद्राबाबूंच्या गाठीभेटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

अनेक विरोधी नेत्यांची आज दिल्लीत घेणार भेट 



नवी दिल्ली : तेलगु देशम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रालोआ सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आता विरोधकांशी गाठीभेटी वाढवण्यास सुरुवात केली आहे. संसदेमध्ये काल अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर नायडू आज कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे नायडू यांच्या याभेटी मागील नेमका अर्थ काय असेल ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नायडू हे कालपासून दिल्लीमध्ये आहेत. आपल्या या दिल्लीभेटीमध्ये त्यांनी काल अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा केली. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, कॉंग्रेस पक्षाचे ज्योतिरादित्य यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांची त्यांनी भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. याच बरोबर काही भाजप नेत्यांची देखील भेट घेऊन त्यांनी 'आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा' या विषयी चर्चा केली होती.



यानंतर आज ते अनेक विरोधी नेत्यांशी प्रत्यक्ष भेटून काही विषयांवर सखोल चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांची आज सकाळी ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान अनेक राजकीय मुद्द्यांवर त्यांची चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु नेमके चर्चेचे मुद्दे काय असतील हे मात्र अजून कळू शकलेले नाही. परंतु चंद्राबाबूंचा या भेटी मागे काही नवी राजकीय समीकरणे असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@