पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा : काँग्रेस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

खा. अशोक चव्हाण यांची मागणी

 

 
 
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून इंधनाच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत आणाव्यात, तसेच इंधनाचे दर कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
 
तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असून सरकार इंधनावर कराचा बोजा टाकत महागाई वाढवत असल्याची टिकादेखील त्यांनी यावेळी केली. टिळक भवनात ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
 
सध्या राज्यात प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८२ तर डिझेलचे दर ६९ रुपये झाले आहेत. मे २०१४ नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ३० टक्क्यांनी ने कमी झाल्या आहेत पण देशात आणि राज्यात इंधनाचे दर मात्र चढेच असल्याचे चव्हाण म्हणाले. वर्षभरात पेट्रोल ७ रूपयांनी तर डिझेल ४ रुपयांनी महागले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीच्या अनुक्रमे ४८.२ टक्के आणि ३८.९ टक्के उत्पादन शुल्क आणि व्हॅट ची आकारणी केली जात असल्याचे ते म्हणाले. तसेच २०१४ साली पेट्रोलवर प्रतिलिटर ९.२ लिटर उत्पादन शुल्क आकारले जात होते. मात्र, आता त्यात वाढ करून जास्त शुल्क आकारले जात असल्याचे ते म्हणाले.
 
 
 
 
दरम्यान, गोवा आणि कर्नाटकमध्ये असलेल्या इंधन दरापेक्षा महाराष्ट्रात इंधानाचे दर अधिक आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला याचा भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या किंमती तात्काळ कमी करण्याची आम्ही मागणी करत असून राज्याभरात काँग्रेसचे कार्यकर्ते याविरोधात आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच देशाची वाटचाल सध्या हुकुमशाहीकडे सुरू झाली असून सर्व स्तरातून झालेल्या विरोधानंतर पत्रकारांवरचे परिपत्रक मागे घेतल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
 
@@AUTHORINFO_V1@@