एमआयडीसीत होणार डोंबिवलीतले पासपोर्ट सेवा केंद्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

 
 
 
 
 
ठाणे : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र कल्याण पश्‍चिमेला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. ठाणे विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याच्या चुकीमुळे डोंबिवलीत पुरेशी जागा नसल्याचे कारण दाखवत मंजूर झालेले पासपोर्ट सेवा केंद्र कल्याण (पश्‍चिम) येथील टपाल कार्यालयात हलविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, खा. डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तातडीने पावले उचलत वेळीच हस्तक्षेप केला.
 
ठाणे विभागीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिक्षकांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली असता, असे निदर्शनास आले की, कल्याण येथील टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. डोंबिवलीतच हे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी एमआयडीसी निवासी विभागातील पोस्ट ऑफिसची जागा पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास योग्य असल्याची माहिती समोर आली. खा. डॉ. शिंदे यांनी ठाणे विभागीय अधीक्षक यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे पासपोर्ट सेवा केंद्र एमआयडीसी निवासी विभागात असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई विभागीय कार्यालयाला पाठवला आहे.
 
तसेच खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवार दि. ३ एप्रिल रोजी यासंदर्भात नवी दिल्ली येथे परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळ्ये यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खा. शिंदे यांनी याबाबतची वस्तुस्थिती मुळ्ये यांच्याकडे मांडली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुळ्ये यांनी डोंबिवलीतच हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.
@@AUTHORINFO_V1@@