रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाची घसरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |
 

 
 
मुंबई : अध्यापनाचा दर्जा, निकालांचा गोंधळ अशा अनेक कारणांचा परिणाम मुंबई विद्यापीठाच्या रॅंकिंगवर झाला आहे. केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या रॅंकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाला १८३ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. तर दुसरीकडे पहिल्या १०० विद्यापीठांच्या यादीत मुंबईतील ४ आणि राज्यातील ८ विद्यापीठांचा समावेश आहे.
 
नुकत्याच जाहीर झालेल्या विद्यापीठांच्या यादीत बंगळुरूच्या इंडियन इन्स्टयिट्यूट ऑफ सायन्सने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला १९ वे, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटला २६ वे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने ३२ वे तर नरसी मोरारजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजला ५५ वे स्थान देण्यात आले आहे.
 
तर सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत मुंबईच्या सेंट झेविअर्स महाविद्यालयाने ७४ वा तर विलेपार्लेच्या मिठीबाई महाविद्यालयाने पहिल्या २०० मध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे.
 
सावित्रीबाई फुले विद्यापीठ ९ व्या स्थानावर
 
पहिल्या १०० विद्यापीठांच्या यादीत राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ९ वे तर सिम्बॉयसिस विद्यापीठाने ४४ वे स्थान पटकावले आहे. तर डॉ. डी. वाय. विद्यापीठाला ५२ वे आणि पुण्यातील भारती विद्यापीठाला ६२ वा क्रमांक देण्यात आला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@